कापरेतील विवाहिता चिमुकलीसह बेपत्ता
चिपळूण ः कापरे मधलीवाडी येथील विवाहिता चिमुकलीसह बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच घडली असून याबाबत येथील पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे. सौ. वैदेही विजय तामुुंडकर (२८), सलोनी विजय तामुंडकर (४) असे विवाहिता व चिमुकलीचे नाव आहे. याबाबत या विवाहितेचे पती विजय शांताराम तामुंडकर यांनी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पत्नी वैदेही चिमुकली सलोनी हिला घेवून ११ जून रोजी सकाळी ११ वा. घरी कोणालाही न सांगता निघून गेली. अद्याप ती परत आलेली नाही.