विधानसभेसाठी उद्योजक नासीरभाई खोत सज्ज, वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारीची शक्यता
शिरगांव ः चिपळूण संगमेश्वर मतदार संघात विधानसभेच्या निवडणुकीसाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांकडून होणार्या आग्रहास्तव वा त्यांच्याच प्रेमापोटी जर मला जनतेची सेवा करण्याचे भाग्य प्राप्त होत असेल तर मी संधीचे सोने करणारच अशी प्रतिक्रिया उद्योजक नासिरभाई खोत यांनी व्यक्त केली.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांची आपापल्यापरीने तयारी सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीकडून नासिरभाई खोत निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते