
पीर लोटे हिंसाचार प्रकरणी अखेर उर्वरित आरोपीना अटकपूर्व जामीन मंजूर
खेड ः पीर लोटे येथे प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी गोवंश हत्येप्रकरणी झालेल्या हिंसाचार प्रकरणी खेड जिल्हा सत्र न्यायाधिशांनी पं. स. सदस्य जीवन गोविंद आंब्रे यांच्यासह आणखी १७ जणांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी ऍड. नितीन केळकर यांनी आरोपींची बाजू मांडली.