
नेत्रसप्ताहात संकल्प करा नेत्रदानाचा डॉ.भालचंद्र स्मृती दृष्टीदिन सप्ताह निमित्त जिल्हा शासकीय रूग्णालयाचे आवाहन
रत्नागिरी : प्रतिनिधी-डॉ.•भालचंद्र स्मृती दृष्टीदिन सप्ताह जिल्हा शासकीय रूग्णालयामार्फत रत्नागिरी जिल्ह्यात १० जूनपासून साजरा होत असून या द्वारे नेत्ररोग व दृष्टिदान याबद्दल अधिकाअधिक जनजागृती करण्यात येत आहे. तर या सप्ताहाच्या निमित्ताने नेत्रदानाचा संकल्प करावा असे अवााहन करण्यात येत आहे.
डॉ.भालचंद्र स्मृती दिन सप्ताह दृष्टिदोष ,अंधत्व इत्यादी संदर्भात तसा कोणताही सप्ताह अथवा दिवस पूर्वी साजरा होत नसे. परंतु डॉ.भालचंद्र म्हणजेच डॉ.रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांनी नेत्रशल्यचिकित्सा या क्षेत्रात दिलेले योगदान ध्यानात घेऊन त्यांच्या स्मृती पित्यर्थ त्यांच्या जन्मदिवसा पासून हा दृष्टिदान सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यातुनच नेत्ररोग व दृष्टिदान याबद्दल अधिकाअधिक जनजागृती करण्यात येत आहे. वास्तविक नेत्ररोग विविध प्रकारचे असतात. त्यामध्ये मोतीबिंदू हा वयोमानानुसार होणारा नेत्ररोग आहे. मात्र आजही याबाबत जागृती होणे गरजेचे आहे.प्रकाशकिरण ही आपल्या पारदर्शक नैसर्गिक भिंगापासून दृष्टिपटलावर पडत असतात जर या भिंगामध्ये अपारदर्शकता निर्माण झाली तर त्यास मोतिबिंदू म्हणतात. डोळयास मार लागणे, डोळयांचे इतर आजार, स्टेरॉईडसारखी औषधे अधिक काळ घेण्यामुळे, तसेच बाकीचे मधुमेहासारखे आजार यामुळे हा नेत्ररोग होता. यात नजरेतला धूसरपणा, डोळयाला रंगीत कडया दिसणे, डोळयांवर लख्ख प्रकाश पडल्यास अजूनच नजर कमी होणे, हळहळ अगदी जवळच्या वस्तूही धूसर दिसायला लागणे ही लक्षणे दिसू लागतात. नेत्ररोगातील दुसरा रोग हा काचबिंदू होय. यात डोके दुखणे,डोळयातून पाणी येणे, डोळे अधेमध्ये अचानक लाल होऊन दुखणे, अनुवंशिकतेनेही काचबिंदू होऊ शकतो., काही रुग्णांमध्ये जन्मजातच काचबिंदू असू शकतो.
गेले काही वर्षांपासून संगणकाचा आणि त्यानंतर मोबाईलचा वापर सर्रास वाढल्याने डोळ्यांना चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहेत. यामध्ये मायोपिया किंवा लांबचे दिसू न शकणे ºहस्वदृष्टीदोष म्हणतात तर ज्यात प्रतिमा ही पटलाच्या मागे पडते.ज्यामुळे रुग्णाला जवळचे पहाण्यास त्रास होतो त्याला दीर्घदृष्टिदोष म्हणतात. चाळशी लागणे हा दीर्घ दृष्टिदोषाचा एक प्रकार आहे.
गेल्या काही वर्षांपासून नेत्रदान हे महान दान मानले जात आहे. नेत्रदान हे एक अवयवदान आहे. ज्या व्यक्तीचे पुढील बुब्बुळ खराब, अपारदर्शक झाले आहे.अशा व्यक्तींना दान केलेल्या डोळ्यांचे पुढील पारदर्शक पटल म्हणजेच कॉर्निया बसवले जातात.या सप्ताहाच्या निमित्ताने जिल्हा शासकीय रूग्णालयाचा नेत्रविभाग दृष्टिदान याबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. हे नेत्रदान मनुष्य मुत्यूनंतर सहा तासाच्या आत केले जाते. मृत व्यक्तींचा फक्त कॉर्निया किंवा संपूर्ण डोळा हा नेत्रदानामध्ये काढला जातो व तो विशिष्ट प्रकारच्या द्रव्यांमध्ये (जसे की एम.के.मिडिया ,कॉर्निसॉल साठवला जातो. गरजवंत रुग्णांना ते योग्य वेळी लावले जातात.
नेत्ररोग आणिनेत्रदान याबाबत जिल्हा शासकीय रूग्णालयाचा नेत्रविभाग मोठ्या प्रामणावर जनजागृती करत असून या सप्ताहाच्या निमित्ताने नेत्रदानाचा संकल्प करवा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बोल्डे करण्यात येत आहे.