
ट्विंकल शर्माच्या अत्याचाराच्या निषेधार्थ अभाविपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
रत्नागिरी ः अलिगड येथे ट्विंकल शर्मावरील अत्याचाराच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रत्नागिरी शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
महिलांके सन्माम में अभाविप मैदान में अशा घोषणा देण्यात आल्या. आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, जलदगती न्यायालयात खटला चालवून ट्विंकल शर्मा यांना न्याय मिळावा अशी मागणी अभाविपतर्फे करण्यात आली.
राहुल राजोरिया, साईजित शिवलकर, तनया पारकर, हृषिकेश वैद्य, प्रतिक्षा गांगण, अमृता तांबे, स्वरांगी धवन, यश परशेटये, देवदत्त पोवळे, प्रेरणा पवार आदी पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.