जिल्ह्यातील लघु पाटबंधारे धरणात अल्प पाणीसाठा शिल्लक
रत्नागिरी ः जिल्ह्यातील लघु पाटबंधारेच्या ६५ धरणांमध्ये अवघ्या ३७ टक्के पाणीसाठा उरला आहे. एकूण धरणांची ही स्थिती असताना यातील सहा धरणांमधील पाणीसाठा संपत आला आहे. तर पाच धरणात शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पाटबंधारे विभागाच्या एकूण ४५ लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. गेल्या मोसमात परतीच्या पावसाने हजेरीच न लावल्याने धरण क्षेत्रांमध्ये पाणीसाठा अपेक्षेप्रमाणे होवू शकला नाही. त्यात यंदाचा उन्हाळा फारच कडक असल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने झाले. विहिरीही आटत गेल्या. त्यामुळे पाण्याच्या वापरात वाढ होत गेली. याचा परिणाम म्हणून धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाली आहे.