
खासदार विजयी मेळाव्यात गुंग, जनता मात्र समस्यांनी त्रस्त, स्वाभिमानचे नागरेकरांचा आरोप
राजापूर ः पहिल्या पावसात तालुक्यातील दोन दिवस वीजपुरवठा ठप्प झाला असून राजापूर तालुकावासियांना अंधारात चाचपडाव लागत आहे. याला आ. राजन साळवी व खासदार विनायक राऊत जबाबदार आहेत. निष्क्रिय लोकप्रतिनिधींमुळे दरवर्षी तालुकावासियांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. अवघा राजापूर तालुका गेले दोन दिवस वीजेअभावी, पाण्याअभावी तडफडत आहे तर वीजपुरवठा नसल्याने हाहाकार उडाला आहे. आमदार, खासदार मात्र याच कालावधीत राजापुरात येवून विजयी मेळावे घेत आहेत, असा आरोपांचा घणाघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष नागरेकर यांनी केला आहे.