
मिर्या नागपूर महामार्गाच्या कामाला आता गती,कुवारबांवमध्ये महामार्गानजिकची दुकाने हटली
मिर्या नागपूर महामार्गाच्या कामाला आता गती मिळाली असून बाजारपेठेतील व्यापारी आणि दुकानदारांनी आपली दुकाने दुसरीकडे हलवून जागा मोकळी करण्यास सुरूवात केली आहे.
अनधिकृत खोके आणि टपर्या काढण्यास सुरूवात झाली आहे. काही दुकानदार आपले सामान पर्यायी जागेत टेम्पो भरून घेवून जात असून काही व्यापारी दुकानांसमोरील पत्र्याच्या शेड काढून घेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आता बाजारपेठेतील मोकळ्या जागी जमिनी सपाटी करण्याचे काम सुरू झाले आहे.
www.konkantoday.com