पावसामुळे व कमी वेगामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
रत्नागिरी ः चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघाले असून यामुळे नियमित गाड्यांसह सर्वच समर स्पेशल गाड्या विक्रमी गर्दीने धावत आहेत. मात्र कोकण रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.
सुट्टी हंगामामुळे गावी येणार्या चाकरमान्यांची संख्या लक्षणीय असते. त्यामुळे प्रशासनाने ४ एप्रिलपासून समर स्पेशल गाड्या सोडून चाकरमान्यांना दिलाचादिला होता. सुट्टीचा हंगाम सुरू झाल्यापासून नियमित गाड्यांसह सर्वच गाड्या गर्दीने धावत आहेत. चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागल्याने रेल्वे गाड्यांना विक्रमी गर्दी होत आहे.