जगबुडी नदीवरील नवीन पुल पावसाआधी चालू होण्याची शक्यता जिल्हाधिकार्यांकडून पाहणी
रत्नागिरी ः मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे नाका येथील जगबुडी नदीवर नव्याने बांधण्यात येणार्या पुलाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. नवीन पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तातडीने ते पूर्णत्वास जावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.
हा पुल पावसाळ्याआधीच वाहतुकीस खुला होणार आहे. यामुळे जुन्या पुलावरून धोकादायक प्रवास आता थांबणार आहे. नवीन पुलावरील डांबरीकरणाचे काम सुरू असून बांधकाम देखील दर्जेदार, उत्तम प्रकारे झाल्याचा दावा करण्यात येत आहे.