क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी तर्फे मराठा समाजातील गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार

क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरी दरवर्षी मराठा समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी उपयुक्त अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असते. 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असते हे लक्षात घेऊन रत्नागिरी तालुक्यातील मराठा समाजातील गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे ठरविले आहे. तरी मराठा समाजातील गुणवान विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, 2019 यावर्षी इयत्ता 10वी च्या परीक्षेला 85% अथवा अधिक गुण तसेच इयत्ता 12वीचे परीक्षेमध्ये 80% अथवा अधिक गुण आणि तसेच MH-CET, NEET व JEE या परीक्षांमध्ये 80% अथवा अधिक गुण (गुणपत्रिकेवरील टक्केवारी प्रमाणे) प्राप्त करुन उत्तीर्ण झालेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत दि. 19/06/2019 पर्यंत दुपारी 1.00 ते संध्या 5.00 या वेळेत (सोमवार व शासकीय सुट्या सोडुन) मंडळाच्या बेसमेंट स्टोअर क्र.3, बी विंग, सिध्दीविनायक रेसिडेन्सी, मजगाव रोड, रत्नागिरी येथे जमा करावी.

संपर्क – 02352-223940
7028154036
8830974065

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button