अर्चना फडकले कळझोंडीच्या नव्या सरपंच
रत्नागिरी ः रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या सौ. अर्चना अनिल फडकले यांची बिनविरोध निवड झाली.
कळझोंडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. मनस्वी शिंदे यांचा दीड वर्षांचा कार्यकाल पूर्ण होताच आपल्या पदाचा राजीनामा दिला. काही दिवस प्रभारी सरपंच म्हणून काम केले. सरपंचपदाच्या निवडणुकीत सौ. अर्चना फडकले यांचा एकमेव अर्ज असल्याने बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले.