२०० मीटर लांबीचा रस्ता स्वखर्चाने बांंधून वाडेकर कुटुंबियांचा जनतेसमोर आदर्श
संगमेश्वर ः माखजन गावानजिकच्या धामापूर गोवळवाडीतील श्री. वाडेकर कुटुंबियांनी स्वखर्चातून व श्रमदानातून २०० मीटर लांबीचा रस्ता तयार करून ग्रामीण जनतेसमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे.
उंच डोंगरावर असलेल्या धामापूर गोवळवाडीला पायाभूत सुविधांपासून अनेक वर्षे वंचित रहावे लागत आहे. मुख्य मार्गावर येण्यासाठी कडा उतरून खाली येण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. पावसाळ्याच्या कालावधीत आजारी रूग्ण, गर्भवती महिलेला वैद्यकीय सुविधेसाठी नेताना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. वाडेकर कुटुंबियांमधील महिलांनी पुढाकार घेवून केवळ सहा महिन्यात सुमारे दीड लाख रुपये खर्च करून स्वखर्चाने रस्ता तयार केला.