
धनजीनाका येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लांबवणाऱ्याच्या आराेपीच्या रत्नागिरी पोलिसांनी हैद्राबादमधून मुसक्या आवळल्या
दोन महिन्यांपूर्वी भरदिवसा शहरातील धनजीनाका येथे महिलेच्या गळ्यातील अंदाजे साडे -चार तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवणाऱ्याच्या रत्नागिरी पोलिसांनी हैद्राबादमधून मुसक्या आवळल्या. न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पठाण यासिन खान कल्लूखान (42, रा. राईखंड अहमदाबाद, गुजरात ) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. चोरीची घटना घडल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवून शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप वांगणेकर, पोलीस नाईक नंदू सावंत, योगेश नार्वेकर या टीमने ही कारवाई केली.
www.konkantoday.com