
रत्नागिरी शहरात संध्याकाळपासून पावसाचा शिडकाव, कोर्ट रस्त्यावर जुना वृक्ष कोसळला, दोन दिवस विद्युत प्रवाह खंडीत होण्याच्या प्रकारात वाढ
रत्नागिरी ः गेले दोन तीन दिवस पावसाळी ढगाने वातावरण झाले असले तरी आज संध्याकाळपासून रत्नागिरी शहर परिसरात पावसाचा शिडकावा सुरू झाला आहे. दुपारपासूनच शहराच्या अनेक भागात सोसाट्याचा वारा सुटला होता. प्रत्यक्षात सायंकाळी किरकोळ पाऊस सुरू झाला. या पावसाने शहरातील रस्ते ओले केले. मात्र वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
खारेघाट रस्त्यावरील कोर्ट परिसरातील एक मोठा वृक्ष रस्त्यावर पूर्णपणे कोसळला. मात्र सुदैवाने त्यावेळी कोणीही जवळपास नसल्याने हानी झाली नाही. मात्र हा वृक्ष दूर करण्याचे काम सुरू असले तरी त्याला काही कालावधी जाणार आहे. वृक्ष कोसळल्यामुळे ते बाजूला करण्याच्या कामामुळे या भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता.
रत्नागिरी शहरात गेले दोन दिवसांपासून सतत विद्युत पुरवठा खंडीत होत असून दिवसभरात विद्युतप्रवाह सतत काही मिनिटांकरिता खंडीत होत असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेक व्यावसायिकांच्या मशिनरी विजेवर असल्यामुळे सतत खंडीत होणार्या विद्युत पुरवठ्यामुळे त्यांच्या व्यवसावरही परिणाम झाला होता. विद्युत प्रवाह खंडीत होण्याची परंपरा आजही सुरू होती.