देशासमोरील कोणतीही आव्हाने स्विकारण्यास भारतीय सैन्यदल सक्षम ः निवृत्त लष्कर अधिकार्यांचे मत
चिपळूण ः देशासमोरील कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास आणि या देशाचे संरक्षण करण्यास हे सैन्यदल सक्षम असल्याचा निर्वाळा निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे, एअर मार्शल भूषण गोखले, एअर मार्शल हेमंत भागवत यांनी चिपळूण येथे स्व.नानासाहेब जोशी यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनी डॉ. उदय निरगुडकर मुलाखत घेत असताना निर्वाळा दिला.
दैनिक सागरचे संस्थापक, संपादक, समाजकल्या, राजकारण, शिक्षण, कला, क्रीडा, साहित्य अशा विविध क्षेत्रात मुक्त विहार करणार्या स्व. निशिकांत तथा नानासाहेब जोशी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी भारतीय सैन्यदलातील या तीन निवृत्त अधिकार्यांना बोलते केले.
नव्या भारताची निर्मिती होते आहे. कोणतीही लष्करी कारवाइई करण्यापूर्वी पंतप्रधानांना ब्रिफिंग केले जाते. त्या कारवाईतील धोके त्यांच्या निदर्शनास आणून दिले जातात आणि त्यानंतरच पंतप्रधान कारवाईचे आदेश देत असतात ही बाबदेखील या अधिकार्यांनी स्पष्ट केली. बालाकोट एअर स्ट्राईक करताना भारतीय सैन्यदलाची क्षमता प्रचंड असल्याचे सिद्ध झाले आहे.