चक्र्रीवादळाच्या शक्यतेने मच्छिमारांना सावधगिरीचे आदेश

रत्नागिरी ः अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटाजवळ चक्रीवादळाचा धोका निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागातील तज्ञांनी व्यक्त केला आहे. २३ जूनपर्यंत मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जावू नये असे आदेश जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आले आहेत.
लक्षद्वीप बेटाच्या उत्तर पश्‍चिम २०० कि.मी. अंतरावर वादळाचे केंद्र राहणार आहे. मुंबईपासून ८०० कि.मी. अंतरावर दक्षिण, पश्‍चिम दिशेने गुजरात राज्याच्या बेरावल भागापासून १०२० कि.मी. पासून जाणार आहे. चक्रीवादळाची तीव्रता बारा तासानंतर वाढणार असून ते उत्तर, पश्‍चिम दिशेला ७२ तासानंतर वळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
चक्रीवादळ प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून दूर अंतरावरून जाणार असले तरी आजपासून सलग तीन दिवस समुद्र खवळलेला राहणार आहे. वादळी वार्‍यासह उंच लाटा उसळण्याची, मुसळधार पावसाची शक्यता १३ जूनपर्यंत कायम आहे. समुद्र, खाडीकिनारी राहणार्‍या नागरिकांसह मच्छिमारांनी १३ जूनपर्यंत सावधानता, सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button