
कोकणकन्या शमिका भिडे हिला पाच पुरस्काराने सन्मानित, अभिनंदनाचा वर्षाव
रत्नागिरी ः रत्नागिरीची सुकन्या शमिका भिडे हिला एकाचवेळी पाच पुरस्कार जाहीर झाले आहेत.
मराठी रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्री, महाराष्ट्र शासन पुरस्कृत बालगंधर्व पुरस्कार, महाराष्ट्र कल्चरल सेंटर पुरस्कृत सौ. ज्योत्सना भोळे गौरव पुरस्कार, गणरंग पुरस्कृत माणिक वर्मा पुरस्कार, सौ. मंगला पाटकर पुरस्कृत कै. वसंत देसाई स्मृती पुरस्कार शमिका भिडे हिला जाहीर झाला आहे.
चि. चौ. कां. रंगभूमीला सर्वोत्कृष्ट संगीत नाटकाचा पुररस्कार जाहीर झाला आहे. अनंत पणशीकर, नाट्यसंपदा कलामंच टीमसह शमिका भिडे हिचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. आजोबा या नात्याने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी शमिका भिडेचा सत्कार करून नाट्य, गायन क्षेत्रातील पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत.