आश्वासने डावलल्याने कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कोकण रेल्वेच्या मुख्य कार्यालयावर धडकले
रत्नागिरी ः प्रत्येक कुटुंबातील किमान एका व्यक्तीला कोकण रेल्वेत नोकरी देऊ असे तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री मधु दंडवते यांनी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांना आश्वासन देवूनही ते पूर्ण न झाल्याने विविध जिल्ह्यातील शेकडो प्रकल्पग्रस्तांनी सीबीडी बेलापूर मधील कोकण रेल्वे कार्यालयावर धडक देत आमरण उपोषणाला सुरूवात केली.
यावेळी त्यांनी सन २००० पासून नोटीफिकेशन प्रमाणे परीक्षा दिलेल्या तसेच उत्तीर्ण झालेल्या कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त उमेदवारांना कोकण रेल्वेत नोकरीत घेत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. या आंदोलनात महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. कोकण रेल्वे प्रकल्पात अनेकांच्या जमिनी गेल्या आहेत.