प्रभारी नगराध्यक्ष बंडया साळवी यांनी घेतली मिरजोळे  ग्रामस्थांची रत्नागिरी पाणीपुरवठा योजनेसंदर्भात बैठक

रत्नागिरी शहराच्या विस्तारीत पाणी पुरवठा योजनेच्या मार्गातील मिरजोळे गावातील ग्रामस्थांच्या पाईपलाईन मधील अडचणी समजून घेण्यासाठी प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी आज मिरजोळे ग्रामपंचायत कार्यालय मध्ये गावातील प्रमुख ग्रामस्थांची बैठक बोलावली होती.
सदर बैठकि मध्ये ग्रामस्थांच्या आडचणी जाणून घेऊन त्या तात्काळ मार्गी लावण्यात आल्या. त्यामुळे आता प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवींच्या या भूमिकेमुळे शहरातील विस्तारीत नळपाणी पुरवठा योजनेच्या शीळ ते साळवी स्टॉप या मार्गाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
या बैठकिला सरपंच गजानन गुरव,उप सरपंच गणेश पडावे,वैभव पाटील,सुरेंद्र पाटील,शरद पाटील,संजय नागवेकर,संजय पंडिये,ग्रामपंचायत सदस्य सौ.मयेकर,सौ.पंडिये तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button