पाईप लाईन फुटणे, वीज पुरवठा खंडीत होणे यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय
रत्नागिरी ः शीळ धरणावरील पाईपलाईन फुटणे, वीजपुरवठा खंडीत होणे आदी तांत्रिक कारणाने पाणीपुरवठ्यात व्यत्यय येत आहे. यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
पावसाला अजूनही सुरूवात झालेली नाही. कडक उन्हाचा मारा सुरू आहे. याबरोबर रत्नागिरीतील पाणीटंचाई वाढली आहे. पानवल धरणातील पाणीसाठा केव्हाच चंपला आहे. एमआयडीसीने पाणीपुरवठ्यात कपात केली आहे. शीळ धरणात ४ आठवडे पुरेल इतका पाणीसाठा आहे.
शीळ धरणावरील पाईप लाईन लिकेज होणे, वीजपुरवठा खंडीत होणे, इतर वेळी पाईपलाईनच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो. त्यामुळे पाणीपुरवठ्यात अडचणी येत आहेत.