
रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील मुरुगवाडा ग्रामस्थांचा किरण सामंत यांच्या उपस्थित शिवसेनेत जाहीर प्रवेश
रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील मुरुगवाडा गावातील ग्रामस्थांनी आज भगवा हातात घेत शिवसेनेत भावी खासदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. मुरुगवाडा गावातील ग्रामस्थांनी आज किरण सामंत यांचे नेतृत्व स्वीकारत शिवसेनेचे नेते सुदेश मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या नेतृत्वाचा स्वीकार केला. आज रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक घटका पर्यत किरण सामंत यांचे काम पोचले असून त्यांच्या कामाची पद्धतीवर आम्ही विश्वास ठेवून आज शिवसेना पक्षात प्रवेश केला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी ईशान नागवेकर ,राकेश उर्फ बंधू पारकर, प्रशांत उर्फ बाळा नागवेकर, महेंद्र उर्फ बंड्या नागवेकर, जितेंद्र उर्फ जितू बिर्जे, सदानंद मयेकर, आशिष नागवेकर, प्रशांत नागवेकर, कुंदन नागवेकर, संतोष नागवेकर, विपुल नागवेकर ,प्रसाद भुते, देवांग बिर्जे, ओम नागवेकर,हितेश बिर्जे,मितेश बिर्जे, सिद्धार्थ रांगणकर, अभिलाष नागवेकर, सिद्धार्थ नागवेकर,अक्षय नागवेकर,समीर नागवेकर,अजय मयेकर,प्रसाद बिर्जे,प्रकाश कुंभार,गुरु नागवेकर,विनोद सुर्वे, अथर्व नागवेकर,निरंजन शेडगे, अशांत पागी, राहुल चव्हाण, परम नागवेकर,सुरेंद्र किर,राहुल जाधव, प्रवीण आग्रे, आशिष नागवेकर, मयूर नागवेकर, गजेंद्र बिर्जे,आदींनी प्रवेश केला.www.konkantoday.com