कार नदीत कोसळून महिला जखमी
चिपळूण ः मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम येथील घाटाच्या पायथ्याशी फरशीतिठानजिक एका कारची तरूणीला धडक बसून कार १५ फूट खोल दरीत कोसळली. याबाबत एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकांशा अशोक शितप (२५) असे या जखमी झालेल्या तरूणीचे नाव असून तिला येथील लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मनोविलसिंग अभिराम पायल याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.