कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या आजपासून कमी वेगाने धावणार
रत्नागिरी ः पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरील सर्व गाड्यांचा वेग मंदावरणार आहे. यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.
दरवर्षी पावसाळी हंगामात म्हणजे १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत कोकण रेल्वे महामार्गावर रेल्वेचा वेग मंदावतो. यामुळे वेळापत्रकातही बदल करण्यात येतो. सोमवारपासून नवीन वेळापत्रक लागू होईल. सुरक्षा पथकाने या मार्गाची पूर्णपणे चाचणी केली आहे. हा मार्ग वाहतुकीस सुरक्षित आहे. पावसाळी हंगामाचा विचार करता अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी प्रशासनाने घेतली आहे. ९०० ट्रॅकमन २४ तास या मार्गावर दक्ष राणार आहेत. अशीही माहिती श्री. गुप्ता यांनी दिली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील सर्व बोगदे व चॅनलवरती धोक्याची सूचना देणारे अलार्म तैनात करण्यात आले आहेत.