अवैध दारूची वाहतूक करणारी आंतरराष्ट्री टोळी पकडली

सिंधुदुर्ग ः राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने कणकवली हुंबरतिठा गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणार्‍या आंतरराष्टीय टोळीवर कारवाई केली. या कारवाईत ४० लाख ८ हजार रुपयांच्या अवैध दारूसह एकूण ५० लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर बिगरपरवाना गोवा बनावटीची अवैधरित्या वाहतूक केल्या प्रकरणी रितेश बाबू पी. उन्नीकृष्णन पी. (३४) व रंजिश व्ही. के. राजन व्ही. के. (३२) दोन्ही रा. केरळ यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरून कणकवली ते रत्नागिरी या मार्गावरून अवैध गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button