ढोकळा खाल्ल्याने ४ मुले रुग्णालयात दाखल

खेड बाजारपेठेतील आर्यन स्वीट मार्ट येथून आजीने आणलेला ढोकळा खाल्ल्यानंतर चार मुलांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी कळंबणी येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना शनिवारी सायंकाळी ८.३० च्या दरम्यान सुसेरी नंबर २ या गावी घडली.सुसेरी नंबर २ येथील पार्वती खेराडे यांनी बाजारपेठेतून घरी जाताना आपल्या नातवंडांसाठी आर्यन स्वीट मार्टमधून ढोकळा विकत नेला.हा धोका खाल्ल्यानंतर आरव खेराडे ,विदेशा खेराडे, निधी खेराडे या बालकांना त्रास होऊ लागला.त्यांना तातडीने कळंबणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही बातमी कळताच आर्यन स्वीट मार्ट दुकानांमध्ये मोठ्या संख्येने सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, राजकीय पुढारी यांनी मोठा जमाव केला होता .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button