बंदी आदेश मोडून मासेमारी सुरूच, दोन मासेमारी नौकांवर कारवाई
रत्नागिरी ः जयगड येथील दोन नौकांवर मत्स्य विभागाने कारवाई करत ४० हजार रु. ची मच्छी जप्त केली आहे. तर त्यांना दोन लाखांचा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे.
सहाय्यक मत्स्य आयुक्त आनंद पालव यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष देसाई, रश्मी आंबुलकर, पुरूषोत्तम घवाळी यांच्या पथकाने दोन नौकांवर कारवाई केली आहे. शौकत अब्दुल उमर डांगे (रा. जयगड) यांच्या नौकेवर ३० हजार रु. ची मच्छी आढळली. त्यांना दीड लाख रु. चा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे. फत्तेमहम्मद मुजावर यांच्या जयगडचा राजा या नौकेवर १० हजार रु. ची मच्छी आढळली, त्यांना ५० हजार रु. दंड प्रस्तावित केला आहे.