
नगर परिषद पतीदेव चालवतात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांच्या आरोपाने खळबळ
रत्नागिरी ः रत्नागिरी नगर परिषदेचा कारभार कोलमडला असून सत्ताधारी शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी देखील वेळेवर उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरले असून नगर परिषदेमध्ये निवडून आलेल्या नगरसेविका शांत असून त्यांचे पतीच परिषदेचा कारभार चालवत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नगरसेवक सुदेश मयेकर यांनी केला आहे.
शीळ धरणात पुरेसे पाणी असूनही नगर परिषदेचे सत्ताधारी व प्रशासन लोकांना पाणी उपलब्ध करून देऊ शकत नाहीत. यापूर्वी सत्ताधार्यांनी शहरवासियांना २४ तास पाणी उपलब्ध करून देण्याचे वचननाम्यात म्हटले होते परंतु आज मात्र त्या विरूद्ध परिस्थिती आहे. सत्ताधारी राजकारणात गुंतले असून जनतेने पाच वर्षाकरिता निवडून दिलेला नगराध्यक्ष आता बदलण्यात येणार असून ही नगराध्यक्षांची निवडणूक शिवसेनेने लादली असून आता त्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येवून निवडणूक लढविण्याचा विचार सुरू असल्याचे मयेकर यांनी सांगितले.
www.konkantoday.com