
चीनच्या मासेमारी नौका विना परवानगी दाभोळ खाडीत,सागरी सुरक्षा धोक्यात?
दाभोळ -भारताचा सागरी किनारा किती असुरक्षित आहे त्याची प्रचीती पुन्हा एकदा आली अाहे.अरबी समुद्रामार्गे रत्नागिरी नजदिक दाभोळ खाडीत चीनच्या दोन मासेमारी नौका अाढळुन आल्या.या बोटींवर तब्बल ३७ खलाशी असल्याचे समजत आहे.या बोटी दुरुस्तीसाठी आणल्या गेल्याचा दावा बोट मालकाने केला आहे परंतु अशा प्रकारचे कोणतेही कागदपत्र त्यांच्याजवळ नाही आहे.
चीनच्या या मासेमारी बोटी तब्बल दीडशे फूट लांब आहेत.अशा प्रकारच्या बोटी अढळल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.दुसऱ्या देशात जाण्याकरिता अनेक परवानग्या घ्याव्या लागतात.परंतु या ठिकाणी कोणत्याही परवानग्या घेण्यात अालया नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याविषयी अधिक तपास पोलीस यंत्रणे व कोस्ट गार्ड मार्फत सुरू अाहे.
परंतु या घटनेमुळे सागरी सुरक्षा किती धोक्यात आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे.