गोवा विमानतळावरून वाहतूक पूर्वरत,’मिग २९ के’ इंधन टाकी कोसळल्याने वाहतूक होती ठप्प
पणजी : गोवा विमानतळावर ‘मिग २९ के’ या लढाऊ विमानाची इंधनाची टाकी कोसळून तिने पेट घेतल्याने गोव्यातील दाभोळी विमानतळ दोन तासांसाठी बंद करण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा वाहतुकीसाठी विमानतळ खुले करण्यात आले आहे.
भारतीय हवाई दलाचे ‘मिग २९ के’ या विमानाची वेगळी होऊ शकणारी इंधनाची टाकी धावपट्टीवर कोसळली. त्यानंतर आग लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दाबोळी विमानतळ काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय भारतीय हवाई दलाकडून घेण्यात आला होता.
दाभोळी विमानतळाहून ‘मिग २९ के’ या लढाऊ विमानाने उड्डाण घेतल्यानंतर ड्रॉप टँक अर्थात विमानापासून वेगळी होणारी इंधन टाकी कोसळली.
www.konkantoday.com