गंगा आल्यामुळे पाऊस लांबल्याची शक्यता? जाणकारांमध्ये चर्चा
रत्नागिरी ः राजापूरमध्ये अवतीर्ण झालेल्या गंगेमुळे या वर्षी पाऊस लांबणार की काय? अशी जाणकारांच्यात चर्चा सुरू आहे. सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती असताना उन्हाळेच्या डोंगरावर असलेल्या गंगेच्या १४ कुंडांमधून तुडुंब पाणी वाहते. मात्र अशा वेळी आलेल्या गंगेमुळे पाऊस लांबतो अशी अनेक वर्षापासूनची जाणकारांची भावना आहे. यावेळी देखील गंगा आल्याने पाऊस लांबणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पूर्वी दर तीन वर्षांनी गंगा प्रकट होत असे परंतु मध्यंतरीच्या भूगर्भातील हालचालीमुळे गंगेचा कालावधी कमीजास्त होत आहे. यावेळी २५ एप्रिल रोजी गंगेचे आगमन झाले होते.
www.konkantoday.com