केरळमध्ये मान्सून दाखल,दोन चार दिवसात कोकणात येण्याची शक्यता.
मान्सूनचं आगमन लांबणीवर पडल्यानं शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. अखेरीस 1 जून या मान्सूनच्या केरळमधील आगमनाच्या अपेक्षित तारखेनंतर तब्बल आठवडाभरानं मान्सून केरळमध्ये दाखल झालाय. गेल्या केल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरी बरसतायेत. मात्र मान्सूनचं केरळमधील आगमन लांबल्यानं महाराष्ट्रामध्येही मान्सून थोडा उशिरा पोहचणार असा अंदाज होता. आता नव्या अंदाजानुसार येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून महाराष्ट्रातही धडक देण्याची शक्यता आहे. मान्सूनं केरळमध्ये धडक दिल्यानं राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवित झालीय.
www.konkantoday.com