लवकरच सवतकडा धबधबा परिसराचे होणार कायापालट -खा.विनायक राऊत
राजापूर तालुक्यातील चुना कोळवण येथील सवतकडा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांसाचे आर्कषण असतो. सवतकडा धबधबा परिसर यंदाच्या पावसाळ्यात अधिक सुसज्ज करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम 2017-18 अंतर्गत मंजूर असलेल्या राजापूर तालुक्यातील चुनाकोळवण येथील सवतकडा धबधबा परिसर सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. या कामाची शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी पाहणी केली. त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना कामासंबंधी योग्य त्या सूचना दिल्या. त्यासमयी राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांच्यासह जिल्हाप्रमुख विलास चाळके, विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती विनोद झगडे, माजी जिल्हा परिषद सभापती शरद लिंगायत, विभागीय संघटक उमेश पराडकर, उपतालुकाप्रमुख विश्वनाथ लाड, जिल्हा परिषदचे अधिकारी उरणकर, पाटील, ठेकेदार गदगु जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.