फोटोग्राफर यांना मारहाण प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर
रत्नागिरी:- समाजात जागरूकता आणण्यासाठी फोटोग्राफर आपले काम करीत असतात मात्र रत्नागिरी जिल्ह्यात सध्या फोटोग्राफरन्वर भ्याड हल्ले होत आहेत ही चिंतेची व गंभीर बाब आहे पाली येथे महिला फोटोग्राफर यांच्या गाडीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला व दिनांक 6 जून रोजी दुपारी बारा वाजता निवळी येथे जागेचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर गेला असता त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली अशा सतत घडत असलेल्या हल्ल्यामुळे फोटोग्राफर त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे तरी याबाबत घटनेची कसून चौकशी करून हल्ला करणाऱ्या या इसमास विरोधात कारवाई करावी अशी विनंती निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे साहेब यांच्याकडे ऑल महाराष्ट्र फोटोग्राफर असोसिएशन व रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर यांच्याकडून करण्यात आली यावेळी फोटोग्राफर कांचन मालगुंडकर, बाळा चौगुले, हर्षल कुलकर्णी महिला फोटोग्राफर सपना देसाई, अजिंक्य सनगरे, आदेश मयेकर, निलेश कोळंबेकर अखिलेश माने, अक्षय लिंगायत आदी फोटोग्राफर उपस्थित होते व रत्नागिरी जिल्ह्यातील फोटोग्राफर यांनी फोनद्वारे पाठिंबा दर्शविला आहे