खेर्डी सरपंचाविरोधात अखेर अविश्वास ठराव
चिपळूण ः खेर्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. जयश्री खताते यांच्याविरोधात तहसिलदार जीवन देसाई यांच्याकडे एकूण १७ पैकी १४ सदस्यांनी अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल केला. या प्रकाराने राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांच्या राजकीय अस्तित्वाला एकप्रकारे स्वकीयांनीच धक्का दिला आहे. येत्या ७ दिवसात याविषयी विशेष सभा आयोजित केली जाणार आहे. खेर्डीचे माजी सरपंच विद्यमान सदस्य दशरथ दाभोळकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे ७ आणि शिवसेनेचे ७ असे एकूण १४ सदस्यांनी तहसीलदार जीवन देसाई यांची भेट घेवून चर्चा केली. सरपंच सौ. खताते यांच्यावर अविश्वास प्रस्ताव लेखी स्वरूपात तहसीलदारांना सादर करण्यात आला. त्यानुसार तहसीलदार देसाई यांनी तो दाखल करून घेतला.