
कशेडी घाटात अवघड वळणावर ट्रक उलटला
खेड ः मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील अवघड वळणावर ब्रेक निकामी झाल्याने ट्रक उलटून अपघात झाल्याची घटना घडली. अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.
ट्रकचालक वसीम खान (वरळी) हा आपल्या ताब्यातील ट्रकमधून प्लायवूड घेवून सुरत येथून गोवा येथे जात होता. कशेडी घाटातील अवघड वळणावर ट्रक आला असता ब्रेक निकामी होवून ट्रक रस्त्याच्या बाजूला उलटला. अपघातचे वृत्त कळताच कशेडी येथील वाहतूक पोलीस निरीक्षक मधुकर गमरे व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत मदकार्य केले.