आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करा अन्यथा पत्रकार १० जूनपासून आमरण उपोषण छेडणार
खेड ः येथील पत्रकारांवर भ्याड हल्ला करणार्या मटका जुगार अड्डेवल्यांवर तडीपारीचे प्रस्ताव सादर करून मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करा अन्यथा जिल्ह्यातील पत्रकार येथील पोलीस स्थानकासमोर येत्या १० जूनपासून आमरण उपोषण छेडणार असल्याचा इशारा खेड, दापोली, मंडणगड तालुक्यातील पत्रकारांनी एका निवेदनाद्वारे ४ जून रोजी दिला आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर भ्याड हल्ला करून दहशत माजविणार्या व पोलिसांना न जुमानणार्या आणि मटका जुगार धंदे चालू कायदा धाब्यावर बसवून समाजात दहशत माजवून सामाजिक अशांतता निर्माण करणारे मटका, जुगार व्यावसायिक यांच्यावर तडीपारीचे प्रस्ताव सादर करुन मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी पत्रकारांनी केली आहे.