
वीज निर्मितीचा टप्पा बंद तरीही महाराष्ट्रात भारनियम होणार नाही
रत्नागिरी ः दीर्घकालीन वीज करार, नवीन स्त्रोतामधून महावितरण कंपनीला आवश्यक असलेली वीज उपलब्ध होत आहे. कोयना वीज निर्मितीचा चौथा टप्पा बंद झाला तरीही विजेच्या उपलब्धतेवर कोणताही परिणाम होणार नाही. महावितरणकडे पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध असल्याने राज्यात भारनियमन होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.