बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या लिंगायत यांना सव्वा लाखाची शासनाकडून मदत
रत्नागिरी ः वन्य प्राण्यांनी हल्ला केला त त्याला चांगले औषधोपचार व्हावे यासाठी शासनामार्फत चांगली मदत व्हावी या उद्देशाने आपण वन राज्यमंत्री असताना मदतीच्या रकमेत वाढ केली होती. सव्वा लाखाचा धनादेश बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी विश्वनाथ चंद्रशेखर लिंगायत याला दिला. माझ्या निर्णयाचा फायदा झाल्याचे समाधान वाटते असे मत म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी व्यक्त केले.