
बंदी आदेश मोडणार्या तीन मच्छिमारी नौका ताब्यात
रत्नागिरी ः पावसाळी मासेमारी बंदीचा काळ सुरू असताना समुद्रात मासेमारी करणार्या आणखी तीन नौका मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या पथकाने पकडल्या आहेत. या नौकेवरील ४ हजार ३३४ रुपये किंमतीची मासळी जप्त करण्यात आली आहे.
जयगड बंदरात तीन नौका पकडल्या आहेत. त्यामध्ये बशीर जैनुद्दीन सांग्रे (रा. जयगड) यांच्या बिस्मिला स्टार्ट या नौकेवर १९५० रुपयांची मासळे फत्ते महंमद हुसेन मुजावर (नौका चालक रा. जयगड) मूळ मालक विवेक सुर्वे (राज. जयगड) यांच्या जयगडचा राजा १ या नौकेवरील १८०० रुपये किंमतीची मासळी, फारूख इकबाल गुहागरकर (रा. गुहागर) यांच्या हवा अल हसन या नौकेवरील ५६४ रुपयांची मासळी जप्त करण्यात आली आहे.