महाराष्ट्र राज्यातील महिलांचे पहिले नमन चिपळूणमध्ये सादर होणार…

रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि अध्यात्मिक क्षेत्रातील अग्रेसर आभार सांस्कृतिक, कला, क्रीडा मंडळ रत्नागिरी या संस्थेच्या वतीने माऊली महिला नमन मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांचे पहिले चौरंगी नमन २५ ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे सादर होणार आहे.

कोकणातील नमन कलेचा सांस्कृतिक वारसा जपण्याच्या हेतूने “आभार” संस्थेने पुढाकार घेतला असून, या नमन मंडळात वय वर्षे १५ ते ७२ या वयोगटातील महिला कलाकार सहभागी होणार आहेत.
याचे लेखक, दिग्दर्शक नमनसम्राट यशवंत वाकडे, निर्माता साईनाथ नागवेकर, “आभार”चे अध्यक्ष विनोद हळदवणेकर, विशेष सहाय्य श्री. दादा वाडेकर, शरद गोळपर, मदन डोर्लेकर, (गुरूजी) वसंत घडशी, सुत्रधार वासुदेव वाघे, सागर मायगडे हे सहाय्य करत असून या नमनातील गीते सौ. सर्वता चव्हाण यांनी लिहिलेली आहेत. मुख्य गायिका सौ. आकांक्षा वायंगणकर, सौ. सर्वता चव्हाण, सौ. वेदा शेट्ये या आहेत. यामध्ये सौ. प्रेरणा विलणकर, श्रीमती ज्योती कदम, सौ. रेश्मा शिंदे, सौ. पूनम गोळपकर, सौ. अर्चना मयेकर, श्रीमती रेखा खातू, सौ. विनया काळप, मनस्वी साळवी, सौ. सर्वता चव्हाण, सौ. रीमा देसाई, सौ. गीता भागवत, पूर्वा चव्हाण, सौ. समीक्षा वालम, सौ. आकांक्षा वायंगणकर, सौ. तन्वी नागवेकर, सौ. शीतल सकपाळ, जुई पावसकर, शोभना वरवटकर, शमिका विलणकर, सौ. वेदा प्रकाश शेट्ये, श्रीमती माधवी पाटील, स्वीटी पावसकर, निधी वरवटकर या कलाकार आहेत. नेपथ्य रचना श्री. बावा आग्रे (लांजा) हे सांभाळत आहेत.
चिपळूण येथे होणाऱ्या या नमनाला उपस्थित राहून सर्व कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button