अल्ताफ संगमेश्वरी यांचा राजापूर अर्बन बँक संचालकपदाचा राजीनामा
राजापूर ः कौटुंबिक कारण देत येथील राजापूर अर्बन बँकेचे संचालक अल्ताफ संगमेश्वरी यांनी आपल्या अखेर संचालकपदाचा राजीनामा दिला. संचालक मंडळाच्या मासिक सभेत हा राजीनामा मंजूर करण्यात आला असून तो माहितीसाठी जिल्हा निबंधकांकडे पाठविण्यात आला आहे. संगमेश्वरी हे अर्बनच्या विद्यमान संचालक मंडळात निवडून आलेले एकमेव शिवसेना पॅनेलचे संचालक होते. उर्वरित संचालक हे शिवसेनेतर सर्वपक्षीय सहकार पॅनेलचे सदस्य आहेत. अल्ताफ संगमेश्वरी हे सद्या रत्नागिरीतील एका फौजदारी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत.