विहिरीत काम करण्यासाठी उतरलेल्या तीन जणांचा गुदमरून मृत्यू
लांजा /प्रतिनिधी
लांजा तालुक्यातील निवसार येथे विहिरीत काम करण्यासाठी उतरलेल्या तीन जन गुदमरून मरण पावल्याची घटना रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे
निवसर मळेवाडी येथील सगवेकर कुटूंबियांची विहीर साफ करण्यासाठी घरातीलच ३ जण विहिरीत उतरले होते खोल विहीर असल्याने साफ करताना सुरवातील अंदाज आला नाही काहीवेळ काम केले नंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले नेमके काय होत आहे याचा त्यांना अंदाज आला नाही
हळू हळू एक एक जण बेशुद्ध पडला या बाबत विहिरीवर असल्याना याची काहीच खबर नाही खालून आवाज येत नाही म्हणून वाकून पाहिले असता तिघेही बेशुद्ध पडल्याचे दिसून आले
या बाबत अधिक मिळालेली माहिती अशी की निवसर वरचीवाडी येथे खोल विहिरीत असलेला गाळ व साफसफाई करण्यासाठी निवसर येथील विजय सागवेकर ( वय – ४४ ) व नंदकुमार सागवेकर ( वय – ४४ ) यांच्या समवेत बांबर येथील अनिल सागवेकर ( वय – २८ ) या तिघांचा गुदमरून मृत्यू झाला आहे या बाबतची खबर निवसर पोलीस पाटील दत्ताराम मेस्त्री यांनी लांजा पोलीस यांनी फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली तातडीने पोलीस
तातडीने पोलीस निरीक्षक नितीन ढेरे ,उपनिरीक्षक पी . व्ही पाटील , चेतन उत्तेकर यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला . अधिक तपास पोलिस करीत आहेत .
निवसर येथील घडलेल्या या घटने मुळे या परिसराचे हळहळ व्यक्त होत आहे.