
विद्यार्थी पास योजनेत अपहार, एस.टी.च्या आगार नियंत्रकावर गुन्हा
रत्नागिरी ः मासिक व त्रैमासिक विद्यार्थी पासवर बनाट वाढीव रक्कमेचा शिक्का मारून १८ हजार ३८० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी राजापूर आगारातील वाहतूक नियंत्रक अभिजित रमाकांत बाकाळकर यांच्याविरूद्ध राजापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजापूर एस.टी. आगारात वाहतूक नियंत्रक म्हणून कर्तव्य बजावत असताना अभिजित रमाकांत बाकाळकर (रा. वरचीपेठ राजापूर) यांनी विद्यार्थी मासिक पास व त्रैमासिक पास देतेवेळी मासिक पासावर बनावट रबरी स्टॅम्पने जादा रक्कमेचे शिक्के मारले होते. जादा रक्कमेचे शिक्के मारल्यानंतर विद्यार्थ्यांकडून जादा रक्कम देखील स्विकारल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.