
रत्नागिरीचे सुपुत्र, चित्रकार रविंद्र मुळेंच्या चित्रांचे जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन
रत्नागिरी ः रत्नागिरीतील एक ज्येष्ठ कलाशिक्षक आणि कोकणातील नामांकित चित्रकार रविंद्र विनायक मुळे यांनी रेखाटलेल्या चित्रांचे मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रांचे प्रदर्शन लावणे ही चित्रकारांसाठी एक फार मोठी पावती बनली जाते. या प्रदर्शनामुळे कोकणातील एका चित्रकाराची अस्सल कला सार्या जगासमोर येणार असल्यामुळे रविंद्र मुळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ४ जून ते १० जून २०१९ या कालावधीत मुंबईतील फोर्ट परिसरात असलेल्या जहांगीर आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.