नदीत पोहायला गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू
वेळणेश्वर ः मित्रासोबत नदीत पोहायला गेलेल्या १६ वर्षीय तरूणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील सड्याचा ढो या ठिकाणी घडली.
खोडदे निवातेवाडी येथील करण शंकर निवाते हा कुटुंबासोबत मुंबई येथे राहतो. मे महिन्याच्या सुट्टीत तो गावी आला होता. ३० मे रोजी दुपारी १.३० च्या दरम्याने तो मित्रांसोबत वाकी नदीत पोहण्यासाठी गेला. पोहण्यात तो विशेष तरबेज नसल्याने नदीतील पाण्याचा त्याला अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांना नदीत तो कुठे दिसेनासा झाल्याने त्यांनी त्याचा शोध घेतला. परंतु त्यांना तो कुठेच न सापडल्याने ही घटना करण यांच्या घरच्यांना कळविण्यात आली.