
दाभोळे रस्त्यावर अज्ञाताचा मृतदेह
लांजा ः लांजा आसगे तळवडे मार्गे दाभोळे रस्त्यावर तळवडे पाण्याची टाकी या ठिकाणी रस्त्यालगत ४० ते ४५ वर्षे वयोगटातील अज्ञात व्यक्ती मृतावस्थेत आढळून आला आहे. या प्रकरणी त्याची ओळख पटविण्याचे आवाहन लांजा पोलिसांनी केले आहे. तळवडे येथे रस्त्यालगत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह २७ मे रोजी आढळून आला होता.