
रत्नागिरी-दापोली येथे इंटरनेटचा शानदार शुभारंभ, आपलं कोकण न्यूज चॅनेल सुरू होणार
खेड ः हॅथवे साईस्टार केबल ऍण्ड डेटा कॉम प्रा. लि. या आंतरराष्ट्रीय दर्जाची इंटरनेटसेवा रत्नागिरी व दापोली येथे शानदार पद्धतीने सुरूवात झाली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष कार्यालयाला भेट देत हॅथवे साईस्टार केबल नेटवर्कचे संचालक उद्योजक सदानंद उर्फ अप्पा कदम व त्यांचे सुुपुत्र अनिकेत कदम यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सदानंद कदम यांनी या इंटरनेट सेवेची माहिती ग्राहकांपर्यंत जावी, यामध्ये तीन, सहा व एक वर्ष अशा स्वरूपात पॅकेज असून अतिशय जलद सेवा असलेल्या या इंटरनेटमध्ये दहा पासून १५० एमबीपीएस स्पीड असणार आहे. या सेवेत वायफाय सेवा सुद्धा असणार आहे. यावेळी कंपनीचे सीईओ पी. व्ही. शाम, सिनिअर मॅनेजर अमरीत शर्मा, रविंद्र चौबे, परेश शेट्टी, नरेश पिंगुळकरसह तज्ज्ञ कर्मचारी व अधिकारी वर्गानी ग्राहकांसाठी विशेष योजना कार्यान्वित केल्याची माहिती दिली.