
गोवळकोटमधील दरडग्रस्तांची परवडच
चिपळूण ः शहरातील गोवळकोट-कदमवाडी येथील दरडग्रस्त १५ कुटुंबियांची परवड चार वर्षानंतरही सुरूच आहे. ऐन पावसाळ्यात संबंधित कुटुंबियांना प्रशासनाने नोटीसा बजावून शासकीय कामकाजाची एकप्रकारे औपचारिकता पार पाडली असतानाच आता या कुटुंबियांच्या पर्यायी व्यवस्थेबाबतही हात वर केले आहेत. त्यामुळे या कुटुंबियांपुढे पुन्हा एकदा स्थलांतराची वेळ आली असून पावसाच्या तोंडावर पर्यायी व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.