
काजू बी तारण योजनेअंतर्गत ६२ लाखांचे कर्ज वाटप
रत्नागिरी ः कृषि उत्पन्न बाजार समितीमार्फत काजू बी तारण योजनेंतर्गत जिल्ह्यातील ६२ लाख रु. चे शेतकर्यांना कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती सभापती दत्तात्रय ढवळे यांनी दिली.
शेतकर्यांना शेतमाल साठवणुकीसाठी पुरेशी सुविधा नसल्यामुळे मालाची मिळेल त्या दरात विक्री करावी लागते. त्यामुळे शेतकर्यांना फार कमी दर मिळतो.
शेतमाल साठवणूक करून ठेवला आणि हंगाम संपल्यानंतर त्याची बाजारपेठेत विक्री केली तर जादा बाजार भाव मिळू शकतो. यासाठी सन २००६ पासून काजू बी साठा तारण योजना सुरू करण्यात आली. पणन मंडळाच्या सहकार्याने राबविलेल्या या योजनेंतर्गत ६२ लाख रु. चे कर्ज वाटप करण्यात आले.